ह्युमन डेव्हलपमेन्ट फाउंडेशन पाचोरा
कौशल्य प्रशिक्षण केंद्र
1 2 3 4 5
|| ह्युमन डेव्हलपमेन्ट फाउंडेशन ||
आपण जगभर पसरलेल्या संगणकाच्या जाळ्यात, या संगणकावरील माहिती मिळविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल ह्युमन डेव्हलपमेन्ट फाउंडेशन तर्फे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत !
आपलं आयुष्य सुखी समाधानी रहावं असा विचार फक्त मानवच करू शकतो. त्यासाठी त्याला आवश्यक असते गुरुकिल्ली. एकदा ही, गुरुकिल्ली सापडली की आयुष्यात अनेकानेक रगांची उधळण करून त्याला टवटवीत ठेवणं माणसाला सोप जातं. पण ही गुरुकिल्ली सहज नाही ना सापडत. त्यासाठी आवश्यक असते स्वतःच्या चौकटीची माहिती.
एकदा स्वतःच्या चौकटीच्या कौशल्यांची, ज्ञानाची, आवडीची आणि पैलूंची जाणीव झाली की या चौकटीच्या कुलपाची गुरूकिल्ली सापडणं सुकर होतं. आपणास आपलं आयुष्य यशस्वी करण्यासाठी ज्ञान, कौशल्य, कला आणि उपलब्ध साधनांच्या मर्यादेत काय काय करता येईल, हे पाहण्यासाठी विविध पर्यांयांची एकत्रित माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न ह्युमन डेव्हलपमेन्ट फाउंडेशन करीत आहे.
ह्युमन डेव्हलपमेन्ट म्हणजे काय तर मानवाचा सर्वांगीण विकास मग तो कुठल्याही स्वरुपात असो. मानवाच्या आयुष्याला आकार देण्यासाठीच्या व यशस्वीतेच्या कुपीपर्यंत आपल्याला पोचता यावं म्हणून शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, महिला, मुले, युवक, युवतींसाठी विविध प्रशिक्षणवर्ग संस्थेमार्फत राबविले जातात.
आपल्या प्रत्येक उपक्रमातुन तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न हयुमन डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या माध्यमातुन आम्ही करीत आहोत.
© Human Foundation. All rights reserved.
Powered By TantraVed Jalgaon