ह्युमन डेव्हलपमेन्ट फाउंडेशन पाचोरा
कौशल्य प्रशिक्षण केंद्र
1 2 3 4 5
|| संस्थेची उद्दिष्टे ||
१. शैक्षणिक
संगणकाचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण वर्ग सुरु करणे तसेच सर्व प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण वर्ग स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग टेक्नीकल, आय. टी. आय. फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वायरमन व इतर कोर्सेसचे प्रशिक्षण देणे व वर्ग सुरु करणे, शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी, लहान मुलांना बालवाडीचे शिक्षण देण्यासाठी बालवाडीचे वर्ग सुरु करणे.
अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक, आय. टी. आय. तांत्रिक, वैद्यकीय, कला, वाणिज्य, कायदा, संगणक, मराठी, इंग्रजी, डी. एड., बी. एड., एम. एड. व बी. पी. एड. तसेच प्रौढ वर्ग शिक्षणाच्या सोई करणे. रात्रशाळा, समाज्याच्या उन्नतीसाठी ग्रंथालय, वाचनालय सुरु करणे. मुकबधीर, अपंग शाळा, शिवण क्लास, स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे, तसेच व्यवस्थापन विषयी प्रशिक्षण देणे.
२. सामाजिक
महिला बालविकासाच्या योजना राबविणे. साक्षरता वर्ग, अंधश्रद्धा व व्यसन मुक्ती निर्मुलन केंद्र, धर्मशाळा, वसतीगृह, वृध्दाश्रम, अनाथाश्रम, आश्रमशाळा सुरु करणे. समाजातील अनाथ, विधवा, विधवा परित्यक्ता यांच्या समस्या सोडविणे. वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन व सामुदायिक विवाहाचे आयोजन करणे, संगणकीय माहिती उपलब्ध करून देणे. सांस्कृतीक सभागृह सुरु करणे. समाजातील गरीब व हुशार होतकरू विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रोत्साहन देणे.
बाल संस्कार केंद्र सुरु करणे. स्त्री पुरुष बचत गट स्थापन करणे व प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करणे. अपंगांसाठी स्वयंरोजगार, नोकरीसाठी मदत करणे. गणेशोत्सव, दुर्गौत्सव साजरे करणे. तसेच थोर पुरुषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी साजरी करणे.
३. सांस्कृतीक
कलाकार, महिला, तरुण, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सर्व प्रकारच्या विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन करणे. चित्रकला स्पर्धा, व्याख्याने, पथनाट्य, चर्चासत्र, लोकनाट्य या कार्यक्रमांचे आयोजन करणे. तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
४. आरोग्य सेवा
आरोग्य विषयक कार्यक्रमांतर्गत ग्रामीण शहरी व आदिवासी भागात आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करणे. आरोग्यासंबंधी कार्यक्रम घेणे.. आरोग्यासंबंधी कार्यक्रम घेणे. एड्स बाबत प्रचार, प्रसार करणे. रुग्णवाहिका सुरु करणे. वैद्यकीय दृष्टीकोनातून रक्तदान व डोळ्यांच्या शिबिरांचे आयोजन करणे. व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविणे.
५. क्रिडा
देशी विदेशी खेळांना प्रोत्साहन देऊन उत्कृष्ट खेळाडू घडविणे व त्या संबंधी विविध स्तरांच्या स्पर्धा आयोजित करून सहभागी करून घेणे. शासनाच्या क्रिडा विषयक योजनांचा लाभ घेऊन खेळाडूंपर्यंत पोहोचविणे.
६. लोकहितार्थ
ग्रामीण विकास व लोककल्याणाविषयी सरकारी, निमसरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे, राज्य शासन, केंद्र शासन, जिल्हा परिषद व पंचायत समिती, समाज कल्याण विभाग यांच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे व अंतिम लाभार्थ्यांना लाभ देणे.
७. जनजागृती
लोक प्रबोधनात्मक व्याख्यानमाला व कार्यक्रमांचे आयोजन करणे. समाज प्रबोधनांतर्गत जनजागृती, अंधश्रद्धा, निर्मुलन, नशाबंदी, कुटुंब नियोजन, हुंडाबंदी इ. विषयी जनजागृती करणे.
८. कृषी
पर्यावरण नियंत्रणाकरिता झाडे लावणे व योग्य तो उपक्रम राबविणे, शेती संबंधी माहिती पुरविणे, मृद संधारण, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या योजना राबविणे. शेती संबंधित नवीन उपकरणे, खते, लागवड, बी-बियाणे या विषयीचे प्रदर्शन भरविणे. तज्ज्ञ अधिकाऱ्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करणे. पर्यावरणाबाबत संशोधन केंद्र सुरु करणे.
प्रात्याक्षिके, शिबिरे, चर्चासत्रे, आयोजित करणे. तसेच शेतीसंबंधी ज्ञान देणाऱ्या शाळा व महाविद्यालये सुरु करणे. वृक्षारोपण करणे व वृक्ष संवर्धनासाठी कार्य करणे. पशुसंवर्धन व गोशाळा प्रकल्प राबविणे.
© Human Foundation. All rights reserved.
Powered By TantraVed Jalgaon