ह्युमन डेव्हलपमेन्ट फाउंडेशन पाचोरा
कौशल्य प्रशिक्षण केंद्र
1 2 3 4 5
|| प्रशिक्षण वर्ग ||
निरनिराळे कपडे ही अत्यावश्यक बाब असून आकर्षक निरनिराळ्या बहुसंख्य प्रकारचे ड्रेस बाजारपेठेम्ध्ये उपलब्ध आहेत. याव्य्व्सायाची ग्रामीण तसेच शहरी विभागामध्ये गरज आहे. लहान मशीनपासून ते कॉमप्यूटर मशीनचा यामध्ये उपयोग केला जातो. ग्रामीण विभागामध्ये आर्टवर्क फॅक्टरी उभारता येऊ शकते. ग्रामीण व शहरी विभागामध्ये महिला छोट्या शिलाई मशिनच्या साह्याने ब्लाउज , परकर ए. सारखे कपडे घरबसल्या फावल्या वेळेत करू शकतील. यामधून त्यांना रोजचे चांगले उत्पन्न मिळेल. तसेच या ट्रेड नंतर त्यांना मोठ्या गारमेंटस कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागू शकेल. खालील ट्रेड हे ग्रामीण व शहरी विभागामध्ये रोजगार निर्मिती करू शकतील अशा प्रकारे तयार केलेले असतात.
बेसिक शिवनकामानंतर हे कोर्सेस केले जातात. यामध्ये आधुनिक ड्रेस , वेस्टर्न स्टाइल व ड्रेसवरील कलाकुसरीचे काम शिकविले जाते. या कोर्समध्ये ड्रेसवरील अत्यधुनिक कलाकुसरीचे काम करता येते. तसेच कॉम्प्युटरच्या सहाय्याने विविध डिझाईन्स तयार करता येतात. ग्रामीण व शहरी भागामध्येसुध्दा या ट्रेडचा उपयोग होतो. या कोर्समुळे मोठ्या गारमेंट कंपन्याम्ध्ये डिझायनर म्हणून नोकरी लागू शकते किंवा महिलांना स्वःतःचे बुटिक चालू करता येते. तसेच या कोर्सेसनंतर मोठ्या ड्रेस विक्री शोरूममध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागू शकते.
मोत्यचे , खड्याचे निरनिराळया दागिन्यांविषयी महिलांमध्ये आवड आहे. कमी किंमत व आकर्षक डिझाईन त्यामुळे त्यांचा खप वाढता आहे. ग्रामीण व शहरी भागामध्ये मोत्याच्या किंवा खड्यांच्या दागिन्यांचा वापर सर्रास होतो. या प्रशिक्षणामध्ये मंगळसूत्राचे विविध प्रकार, मोत्याचे हार,खड्याचे हार, ब्रेसलेट,पेंजणाचे विविध प्रकार शिकवले जातात. तसेच कॉम्प्युटरर्स व्दारा ज्वेलरी डिझाईनचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणानंतर महिलांसाठी घरबसल्या दागिन बनविण्याचा व विक्री करण्याचा व्यवसाय करू शकतात. शहरामध्ये मोठ्या दागिने विक्री शोरूममध्ये नोकरी लागू शकते. विविध प्रदर्शन , यात्रा यामध्ये हे दागिने चांगले विकले जातात व या ज्वेलरीला परदेशी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. तसेच स्थानिक बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे.
सौदर्याविषयी आवड सर्वच महिलांना असते. त्यामुळे शहरांमध्ये पार्लरची संख्या वाढते आहे. ग्रामिण भागांमध्ये ब्युटी पार्लरचा व्यवसाय जोर धरू लागलाय. घरच्या घरी किंवा शॉपीमध्ये हा व्यवसाय चालू करता येतो. या कोर्समध्ये ब्युटी पार्लरचे बेसिक व अॅडव्हांस प्रशिक्षण दिले जाते. यात प्रामुख्याने निरनिराळे हेअर कट, फेशिअल, मेकअप व अॅडव्हांस ब्युटी ट्रीटमेंट इ. चा समावेश होतो या कोर्सनंतर महिलांना शहरामधील अत्याधुनिक पार्लरमध्ये नोकरी मिळू शकते. किंवा त्या स्वत:चे पार्लर उभारू शकतात. या ट्रेडमधून त्यांना चंगली रोजगार निर्मिती होते.
हॉटेल व्यवसाय सर्वत्र वाढत चाललाय. या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सध्या या क्षेत्रामध्ये रोजगारासाठी चांगल्या ‌‌‌‌‌‍‌‍‍‍‌‌संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण किंवा शहरी विभागामध्ये महिला भाजी – पोळी केंद्र किंवा स्नॅक विभागामध्ये हाँटेल व लाँजीग या क्षेत्रामध्ये महिला आपले करीअर करू शकतात. चांगल्या कुकना परदेशीसुद्धा मागणी आहे. मोठ्या हाँटेलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
सध्याच्या युगामध्ये कॉम्प्यूटर अत्यंत गरजेचा झाला आहे. सर्व ऑफिसमध्ये याचा वापर होत आहे. कॉम्प्यूटर ज्ञान सध्याच्या पिढीला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कोर्सेमध्ये बेसिक, टॅली, डि.टी.पी, हार्डवेअर, नेट्वर्किंग, इ.चे ज्ञान दिले जाते. तसेच बिपिओ कोर्सेसनंतर मोठया कंपन्यामध्ये किंवा परदेशी नोकरी मिळू शकते. या कोर्सेसनंतर महिला स्वत:चा डीटीपीची किंवा टायपिंगचा व्यावसाय सुरू करू शकतात. किंवा चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. तसेच प्रिंटींग क्षेत्रामध्ये व्यवसाय उभारू शकतात या ट्रेडमध्ये व्यवसायाच्या व नोकरीच्या खूपच मागणी आहे. व रोजगाराला भविष्यामध्ये चांगलला वाव आहे.
लोकसंख्या वाढीमुळे व प्रदुषित वातावरण यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चाललेला आहे . त्यामुळे डॉक्टर व हॉस्पिटलची संख्या सर्व गावांमध्ये वाढत आहे . हॉस्पिटल/ डॉक्टर यांना कुशल मदतनिस / सहाय्यक किंवा सहाय्यक परिचरिका यांची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच गाव / वस्तीपातळीवर जेथे डॉक्टर उपलब्ध नसतात तेव्हा तातडीच्या वेळी प्रथमोपचारासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये पेशंटला पोहचविण्यापर्यतची देखभालही प्रशिक्षित स्थानिक तरूण /तरूणी/ महिला यांचेमार्फत केली जाऊ शकते. असे आरोग्य मित्र वृद्धांची / आजा–यांची घरी जाऊन सेवा करू शकतात. नामवंत हॉस्पिटल / डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाने या कोर्सचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे.
या ट्रेडद्वारे बुक बायंडिंग, प्रिंटींग, कटींग इ. चे प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षण व्यवसाय अंतर्गत महिला ग्रामिण तसेच शहरी विभागामध्ये मॉंलचे जाळे सर्वत्र पसरू लागले आहे. तसेच कापड दागिने इ. ची मोठी शोरुम उभी राहत आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये सेल्स पर्सेनची आवश्यकता आहे. सध्या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाचा तुटवडा आहे. या विविध कोर्सनंतर स्वतःच्या शॉपीचे / दुकानाचे उत्तम व्यवस्थापन करता येते. तसेच विक्रीकौशल्याद्वारे माल चांगल्याप्रकारे खपविला जातो. कोर्सेसनंतर मॉंल/ दुकाने / शॉप्स मध्ये सेल्समन म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते तसेच परदेशीसुध्दा नोकरीच्य संधी उपलब्ध आहेत.
ग्रामिण तसेच शहरी विभागमध्ये मॉंलचे जाळे सर्वत्र पसरू लागले आहे. तसेच कापड,दागिने इ.ची मोठी शोरुम उभी राहत आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये सेल्स पर्सेनची आवश्यकता आहे. सध्या या क्षेत्रामध्ये कुशलमनुष्यबळाचा तुटवडा आहे. या विविध कोर्सनंतर स्वतःच्या शॉपीचे / दुकानाचे उत्तम व्यवस्थापन करता येते. तसेच विक्री कौशल्याद्वारे माल चांगल्याप्रकारे खपविला जातो. कोर्सेसनंतर मॉंल/ दुकाने / शॉप्स मध्ये सेल्समन म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते तसेच परदेशीसुध्दा नोकरीच्य संधी उपलब्ध आहेत.
महिलांमध्ये उपजतच विविध कलागुण असतात. या कलागुणांना थोडेसे प्रशिक्षण, मार्गदर्शन दिले तर त्यांना अधिक वाव मिळतो. तज्ञ मार्गदर्शनाच्या सहाय्याने अशी प्रशिक्षणे आयोजित केली जातात. सदरहुन कोर्समध्ये निरनिराळ्या मिठाई, चाट आईसक्रीम इ. चे प्रशिक्षण दिले जाते. या कोर्सनंतर महिला स्वतःचा मिठईचा व्यवसाय चालू करू शकतात. ग्रामिण किंवा शहरी विभागामध्ये मिठाईना चांगली मागणी असते. शाळा, लग्न समारंभ, विविध कार्यक्रम यांना मिठाई पुरवू शकतात. दिवाळीच्या सणामध्ये या मिठाई बॉस्केसना कंपन्याकडून चंगली मागणी असते. स्वतःचे मिठाईचे दुकान चालू करू शकतात. किंवा दुकानदारांना मिठाई पुरवू शकतात
शहरामध्ये कंपनी तसेच व्हीआयपी लोकांसाठी सिक्युरिटी गरजेची आहे. वाढती लोकसंख्या व असुरक्षित वातावरण यामुळे सर्वच मोठ्या कंपन्या ऑफिसेस, माॅल या ठिकाणी सिक्युरिटी गरजेची बाब झालेली आहे. या व्यवसायमुळे भविष्यात खूपच चागल्या संधी उपलब्ध आहेत.मुखत्वे महिला वर्गासाठी महिला व सिक्युरिटी गार्डची आवशकता असते. या कोर्सेसनंतर महिलांना चागल्या सिक्युरिटी कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते किंवा आपला स्वतःचा सिक्युरिटी गार्ड पुरविण्याचा व्यवसाय चालू करू शकतात.विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांची टेंडर मिळु शकतात. या व्यवसायामधून चागली रोजगार निर्मिती होते. तसेच चागल्या प्रकारे उत्पन्न मिळु शकते. व्यवसाय चालू करण्यासाठी अल्प भांडवलाची गरज असते.
कंपनीमध्ये स्टोअर्स विभाग आहे. महिलांना उपजतच हाउस कीपिंगचे ज्ञान असल्याने या विभागात त्या चांगले काम करू शकतात. कंपन्यामध्ये या क्षेत्रामध्ये महिलांना विशेष मागणी आहे. या कोर्सेसमध्ये कंपनी अथवा मॉलमध्ये स्टोअरकीपिंग, मटेरिअल हॅन्डलिंग इ.विषयांचे सखोल ज्ञान दिले जाते. या कोर्सेनंतर कंपनीमध्ये स्टोअर विभागामध्ये नोकरी मिलु शकते. किंवा मोठ्या मॉल्समध्ये रोजगाराची संधी मिळते. महिला स्वतःच्या व्यवसायामध्ये सुद्धा या ज्ञानाचा वापर करून नफा वाढवू शकतात.
शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय केल्याने कुटुंबांना चागले उत्पन्न मिळु शकेल. भारत शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतीमध्ये विविध संधी आहेत. शेतीपुरक व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येतात. ग्रामीण विभागामध्ये महिला कुकुटपालन, शेळीपालन, म्हैस/गाय पालनाचा व्यवसाय उत्तमरीत्या सुरु करू शकतील. शेतीपुरक व्यवसायासाठी स्थानिक किंवा शहरी विभागासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे. शासनाच्या विविध सवलती याकरिता उपलब्ध आहेत. त्यांचा वापर चांगला व्यवसाय उभा राहू शकताे. महिला संस्थाद्वारे छोटे प्रकल्प उभारून चांगला उत्पन्नाचा व्यवसाय तयार होतो.
दैनंदिनजीवनात काम चांगल्याप्रकारे करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. यामुळे भाषा, व्यक्तिमत्व सुधारते. चांगल्या व्यक्तिमत्वामुळे स्वतःच्या व्यवसायामध्ये चांगली प्रगती करता येते. ग्राहकांवर चांगली छाप पडते. इंग्रजीची भीती नाहीशी होते. या कोर्सेसनंतर महिला स्वतःची प्रशिक्षण संस्था चालू करू शकतील. किंवा इतरत्र नोकरी करू शकतील. महिलांच्या सुप्त गुणांना चांगला वाव मिळतो. व उद्योग चांगल्या प्रकारे होते.
ग्रामीण किंवा शहरी विभागामधील महिला या कुटीर /लघु उद्योग सुरु करून रोजचे चांगले पेंसे मिळवू शकतील. पुढील उद्योगांचे प्रशिक्षण तज्ञांमार्फत तयार केले असून यामध्ये उत्पादन, किंमत, विक्री,बाजारपेठ या सर्वांचे संपुर्ण ज्ञान दिले जाणार आहे. या उद्योगांना शासनाच्या विविध सबसीडी योजना आहेत. यामुळे छोटे प्रकल्प अल्प भांडवलामध्ये उभारता येतात. यामुळे चांगली रोजगार निर्मिती होते व स्वतःचा व्यवसाय निर्मिती होते.
अंगणवाडी विकास प्रकल्प ही योजना लहान मुलांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केली आहे. तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालके ही या योजनेचा केंद्र बिंदू समजला जातो. लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ झपाट्याने होत असते म्हणून लहान मुलांना योग्य संस्कारमयशिक्षण देणे, त्यांच्या बुद्धीचा विकास करणे, शारीरिक विकास करणे याबाबतचे सर्व शिक्षण यात समाविष्ट करण्यात आले आहे.
© Human Foundation. All rights reserved.
Powered By TantraVed Jalgaon